वडगावशेरीत पाण्याची प्रतिक्षाच   

खराडी : वडगावशेरी, विमाननगर, खराडी आणि चंदननगर परिसरात पाणीप्रश्न तत्काळ सोडवा अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या अधिकार्‍यांना दिली.एक महिन्यापासून खराडी, वडगावशेरी, चंदननगर परिसरातील नागरिकांना  पिण्याचे पाणी मिळत नाही. अधिकारीच कृत्रिम टंचाई करत असल्याने माजी नरसेविका उषा कळमकर यांच्या नेेतृत्वाखाली नागरिकांनी  उषोषण केले. परंतू अधिकार्‍यांनी फक्त आश्वासन दिले. यामुळे उषा कळमकर यांनी सरळ उपमुख्यमंत्री अजित पवार याच्याकडे सरळ तक्रार केली. यानंतर अजित पवार यांनी पुणे विमानतळ येथे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. बैठकीत अधिकार्‍यांना तत्काळ पाणी प्रश्न मार्गी लावा अन्यथा गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी  दिली. तत्पूर्वी माजी आमदार सुनील टिंगरे यांनी दूरध्वनीवरून अजित पवार यांच्याशी संपर्क साधून परिसरातील पाणीप्रश्नाबाबत त्यांना माहिती दिली होती. यावेळी माजी आमदार सुनील टिंगरे, पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकुमार जगताप, एकनाथ गाडेकर, माऊली कळमकर, बापू कळमकर आदी या वेळी उपस्थित होते.

Related Articles